मनोरंजनसृष्टीसह संगीत क्षेत्रात नाव कमवायचे असेल तर अनेक वर्षांच्या मेहनतीबरोबरच ताल, सूर आणि लय यातही परिपूर्ण असावं लागतं. तर दुसरीकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी नाव कमावलं आहे. त्यातीलच एक नाव म्हणजे ढिंच्याक पूजा. ढिंच्याक पूजाने 'सेल्फी मैंने ले ली आज' हे गाणे यूट्युबवर रिलीज केल्यानंतर रातोरात ती प्रसिद्धीच्या झोतात आली. सध्या तिचे 'आय अॅम अ बायकर' हे गाणे रिलीज झाले असून सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय झाले आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधील ढिंच्याक पूजाचा लूक हटके आहे. पूजाने या गाण्याचा व्हिडीओ शेअर करताच दोन दिवसांतच या गाण्याला 82 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच तिचे हे गाणे सोशल मीडियावर नेटकरी ट्रोल करताना दिसत आहेत.