प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथवर होणाऱ्या कार्यक्रमात लोकांना मास्क घालणे आणि सामाजिक अंतर राखणे यासारख्या सर्व कोविड नियमांचे पालन करावे लागेल. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याबाबत मार्गदर्शक सूचना अभ्यागतांसाठी बसण्याची जागा सकाळी सात वाजता उघडली जाईल अभ्यागतांना नियुक्त केलेल्या ठिकाणीच बसावे कोरोनाविरोधी लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे लसीचे प्रमाणपत्र सोबत बाळगावे 15 वर्षांखालील मुलांना कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची परवानगी नाही पार्किंग मर्यादित आहे, त्यामुळे कार पूल किंवा टॅक्सीने कार्यक्रमाला यावे अभ्यागतांनी प्रवेशपत्रासोबत वैध ओळखपत्र (आधार कार्ड, मतदार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इ.) आणावे सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत 27 हजारांहून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत