आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असते. व्हिटॅमिन सी व्यतिरिक्त, त्यात ट्रेटीनोइन देखील असते ज्यामुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. आवळा कोणत्याही शरीरातील हानिकारक, विषारी घटकांशी लढण्यास मदत करते. यासाठी तुम्ही दररोज तीन आवळ्याचे सेवन करू शकता. हळदीकडे एँटीबायोटीक म्हणून पाहिले जाते. हळद आपल्या शरीराला संसर्गजन्य रोगांपासून दूर राहण्याची ताकद देते. जर तुम्ही याचा रोज वापर केला तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती तर वाढवतेच शिवाय अशा धोकादायक आजारांपासून तुमचे संरक्षणही होते. हिवाळ्यात त्यामुळे आल्याचे सेवन जरूर करावे. आल्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म आढळतात. खोकला झाल्यास आले, गूळ, ओवा आणि तूप खाण्याचा सल्ला दिला जातो. दालचिनीमध्येही औषधी गुणधर्म असल्याचे मानले जाते. दालचिनी खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्तीही वाढते. जर तुम्ही दालचिनीचे दररोज सेवन केले तर ते कोरोनासारख्या संसर्गजन्य आजारांपासून दूर राहण्यासाठी प्रभावी ठरू शकते.