प्रजासत्ताक दिनी विठुरायाच्या राऊळीला तिरंगी साज प्रजासत्ताक दिनाला संपूर्ण देश तिरंगी रंगात न्हाऊन निघत आहे. अशातच विठुरायाही या तिरंगी रंगात रंगला असून मंदिरालाही आकर्षक तिरंगी फुलांची सजावट करण्यात आली आहे. देवाचे पुणे येथील भाविक सचिन चव्हाण आणि संदीप पोकळे यांनी ही फुल सजावटीची सेवा दिली आहे. तिरंग्याची सजावट करताना झेंडू, शेवंती आणि कामिनी या फुलांचा वापर करण्यात आला आहे. यासोबतच देवाच्या आणि रुक्मिणी मातेच्या अंगावरही तिरंगी उपरणं घालण्यात आलं आहे . प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून केलेली ही मनमोहक सजावट 26 जानेवारीला विठ्ठल भक्तांसाठी अनोखी भेट ठरली आहे. (Photo Gallery : Pandharpur Vitthal Rukmini Temple)