कला क्षेत्रात प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण जाहीर झाला आहे बालाजी तांबे यांना (मरणोत्तर) पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्य क्षेत्रात वेगळा ठसा उमटवलेल्या राधेशाम खेमका यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार : विजयकुमार डोंगरे यांना मेडिसीन क्षेत्रातील कामगिरीबद्दल पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. सीरम इन्स्टिस्ट्यूटचे संस्थापक सायरस पुनावाला यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर केला आहे लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे गायक सोनू निगम याला पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे डॉ. हिम्मतराव बावस्कर यांना मेडिसीन क्षेत्रातील कामगिरीबद्दल पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंग (मरणोत्तर) यांनाही पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे विज्ञान आणि अभियांत्रिकी या क्षेत्रातील कामगिरीबद्ल अनिल राजवंशी यांना पद्मश्री जाहीर झाला आहे. भिमसेन सिंगल यांना मेडिसीन क्षेत्रातील कामगिरीबद्दल पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. नटराजन चंद्रशेखरन यांना व्यापार क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.