अनन्या पांडे स्वत:ला निरोगी आणि फिट ठेवण्यासाठी जिम, योगा, पोहणे आणि नृत्य करते. वर्कआऊटशिवाय अनन्या तिच्या डाएटची विशेष काळजी घेते. अनन्या पांडे तिच्या आहारात हंगामी फळे, नारळ पाणी आणि ताज्या फळांचे रस समाविष्ट करण्यास विसरत नाही. डान्स आणि स्पोर्ट्सला हा आपल्या फिटनेसचा मंत्र असल्याचे अनन्या सांगते. अनन्या म्हणते, डान्य आणि स्पोर्टमुळे केवळ कॅलरी बर्न होत नाही तर वर्कआउटचाही आनंद घेता येतो. अनन्या पूर्ण झोप घेते आणि भरपूर पाणी पिते. अनन्याला अंड्यांचा पांढरा भाग, लो फॅट दूध किंवा इडली, डोसा किंवा उपमा असे दक्षिण भारतीय पदार्थ खाणे आवडते. अनन्या आपल्या दुपारच्या जेवणात ताज्या भाज्या, ग्रील्ड फिशसह 2 चपात्या खाते अनन्याला संध्याकाळी भूक लागते त्यावेळी तिला फिल्टर कॉफी आणि नट्स घेणे आवडते. रात्रीच्या जेवणात अनन्या भाजी, कोशिंबीर आणि 1 चपाती खाते