मराठीतील प्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरीला कोरोनाची लागण देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमायक्रॉनबाधितांमध्येही वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांत बॉलिवूड मनोरंजन सृष्टीतील अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे. बॉलिवूड पाठोपाठ मराठी सिनेसृष्टीतही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. मराठीतील प्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरीला कोरोनाची लागण झाली आहे. अंकुश चौधरीने ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. अंकुशने ट्वीट करत लिहिले आहे, माझी कोरोना चाचणी पॅाझिटीव्ह आली आहे. डॅाक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू आहेत आणि तुमचे आशिर्वाद आहेच.