दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा: द राइज' सिनेमा बॉक्सऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

आता हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील प्रदर्शित होणार आहे.

7 जानेवारी पासून हा सिनेमा
अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

अॅमेझॉन प्राइम व्हिडीओने ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.

पुष्पा सिनेमाच्या पोस्टरचा फोटो शेअर करत त्यांनी लिहिले आहे, तो लढेल..तो धावेल...तो उडी मारेल...पण तो झुकणार नाही.

7 जानेवारी रोजी हा सिनेमा तेलुग, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

'पुष्पा: द राइज' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 300 कोटींचा टप्पा पार केला आहे.

अल्लू अर्जुनच्या अभिनयाचेदेखील चाहते कौतुक करत आहेत.

संपूर्ण देशभरात एकाच वेळी प्रदर्शित झालेला अल्लू अर्जुनचा हा पहिलाच चित्रपट आहे.