झी मराठीवर नव्याने सुरु होत असलेल्या 'बँड बाजा वरात' या कार्यक्रमामधून रेणूका शहाणे कमबॅक करत आहे. झी मराठी वाहिनीने नुकतंच एका नवीन प्रोमो शेअर केला आहे. या कार्यक्रमात सूत्रसंचालन अभिनेत्री रेणुका शहाणे आणि अभिनेता पुष्कराज चिरपुटकर करणार आहेत. हा कार्यक्रम 18 मार्च पासून शुक्रवार आणि शनिवार रात्री 9.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमातून लग्नघरातील नववधू-वरांना झी मराठीकडून आहेर मिळणार आहे. प्रोमोमध्ये रेणुका शहाणे झी मराठीकडून आहेर लग्नघरात सप्रेम भेट म्हणून घेऊन जाताना दिसत आहेत.