अंगावर पित्त उठलं असेल तर पुदिन्याची पानं पाण्यात उकळावीत.त्यात साखर घालून ते पाणी प्यावे.

पुदिन्याच्या पानांचा रस अंगाला लावावा.

पाण्यात किंवा दूधात हळद मिसळून प्यावी.

कोकम सरबत प्यावे.

कोकमचा रस देखील तुम्ही अंगाला लावू शकता.

आलं आणि काळीमिरी देखील परिणामकारक ठरते.

आल्याच्या रसात तूप आणि मध घालून हे चाटण घ्यावे.

फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करावा.

फळं , पालेभाज्या , कोशिंबीर याचा समावेश आहारात करावा.

तुळस , कोरफड , आवळा याचा समावेळ करावा.