भारतीय लोक प्राचीन संस्कृतीचे जतन करण्यात आपले पहिले कर्तव्य मानतात.
भारतातील अनेक प्राचीन मंदिरांना खूप महत्व दिले जाते.
त्यामधील लोणारच्या दैत्यसुमन मंदिराला एक विशेष महत्व आहे.
वैज्ञानिक महत्वासोबत अध्यात्मिक महत्त्व असलेल्या लोणार येथील वास्तुकले अद्भुत दर्शन पाहायला मिळते.
दैत्यसुमन मंदिरात भगवान विष्णूच्या मूर्तीच्या मस्तकी काल पासून सूर्यकिरणांच्या अभिषेक होत आहे.
ही लोणार सरोवराला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी एक पर्वणीच आहे.
दरवर्षी मे महिन्यात पाच दिवस हा सूर्यकिरणांचा अभिषेक होत असतो.
या वर्षी कालपासून लोणार येथील या मंदिरात थेट सूर्यकिरण गाभाऱ्यातील भगवान विष्णूच्या मूर्तीवर पडतात.
यावेळी भगवान विष्णूच्या मूर्तीच विहंगम रूप बघायला मिळत.
त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक लोणार येथे येत असतात.