भगवान शंकराच्या मंदिरात नंदी हा असतोच!
आपल्या हजारो कोटी देव देवतांचे वाहन हंस, मोर, गरूड, उंदीर असल्याचं पाहतो
जसं गणपतीचं उंदीर तसंच भगवान शंकराचं वाहन हे नंदी बैल आहे.
बैलाला नंदी म्हटलं जातं. नंदी म्हणजे आनंदस्वरूप.
देवाला आनंदस्वरूप असणारं वाहन आवडते.
देवाजवळ जाण्यास आणि त्याचे वाहन झाल्यामुळे जीवन आनंदस्वरूप होऊ शकते असा नंदिचा संदेश आहे.
नंदी म्हणजे बैल, भागवतकार महर्षि वेदव्यास यांनी भागवतमध्ये बैलाला रूपक देऊन धर्माचे महत्त्व सांगितलं आहे.
नांगराला जोडल्यामुळे धान्य उगवण्यास माणसाला मदत होते.
मांसाहाराकडून त्याला शाकाहाराकडे वळविण्याच्या ऋषिमुनींच्या प्रयत्नामध्ये बैलाचा लहानसा हिस्सा आहे.
हा लहानसा पण महत्त्वाचा हिस्सा घेतल्याने त्याला देवाजवळ स्थान मिळालं आहे.
बैलाला धर्माचे प्रतिक मानले आहे. म्हणजेच देवाचे स्वत:चे वाहन म्हणून धर्माला ठेवले आहे.
खरंतर, आपल्या हिंदू संस्कृतीत प्रत्येक देवाचं एक वाहन आहे.