ही मूर्ती सुमारे 6 फुट उंच असुन ह्या मूर्तीस शहापूरचा चुन्याचा मारुती म्हणतात.
येथील मारुतीच्या मूर्तीला महारुद्र हनुमान संबोधिले जाते. ही मूर्ती 5 फुट उंच असून चुन्याने बनविली आहे.
या ठिकाणी दोन मारुतीच्या मूर्ती आहेत.पहिल्या मूर्तीला दास मारुती म्हणतात.
या चाफळच्या मूर्तीला वीर मारुती म्हणतात.
या मूर्तीची उंची साडेतीन फुट असून येथील टेकडीवर असलेल्या गुहेत ही मूर्ती आहे.
ही मूर्ती चुना वाळू व ताग यापासून बनलेली आहे.
माजगाव या ठिकाणी एका धोंडयावर कोरलेली ही मूर्ती आहे.
हे गाव कृष्णा नदीच्या काठावर आहे. तेथील राम मंदिराच्या मागे स्थापिलेली मूर्ती आहे.
येथे कौलारू मंदिरात सुमारे साडेपाच फुट उंचीची ही मूर्ती आहे.
जुना पारगाव येथे समर्थांनी स्थापिलेली सपाट दगडावर कोरलेली दीड फुट उंचीची मूर्ती आहे.
सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळेमधील मारुतीची मूर्ती 7 फुट उंच असून उत्तराभिमुख आहे.