ओडिसामध्ये दरवर्षी भगवान जगन्नाथाची रथयात्रा निघते.



या रथयात्रेत भगवान जगन्नाथांसोबत त्यांचा भाऊ बलराम आणि त्यांची बहीण सुभद्रा यांचाही रथ असतो.



जगन्नाथपुरी या तीर्थक्षेत्राबद्दल अनेक रहस्य आहेत, याबद्दलच आज जाणून घेऊया.



ओडिसातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र जगन्नाथ पुरी येथे दरवर्षी भगवान जगन्नाथाची रथयात्रा काढली जाते.



यंदा 7 जुलैपासून रथयात्रा काढण्यात सुरू झाली आहे.



तब्बल 10 दिवस ही रथयात्रा (Jagannath Rath Yatra 2024) चालते.



भगवान जगन्नाथ, बहीण सुभद्रा आणि मोठा भाऊ बलराम यांच्या मूर्तींना हात, पाय किंवा पंजे ​​नाहीत.



प्राचीन काळी या मूर्ती बनवण्याचे काम विश्वकर्मा करत होते.



मूर्ती बनवण्याचे काम पूर्ण होईपर्यंत कोणीही त्यांच्या खोलीत प्रवेश करणार नाही, अशी त्यांची अट होती.



पण तरीही राजाने आपल्या खोलीचं दार उघडलं तेव्हा विश्वकर्माजींनी मूर्ती बनवणं अर्धवट सोडलं.



तेव्हापासून ही शिल्पं अपूर्ण राहून आजतागायत पूर्ण झालेली नाहीत.



तेव्हापासून या तिन्ही मूर्तींना हात, पाय आणि पंजे नाहीत.



कृष्ण आणि बलरामांची प्रिय बहीण सुभद्रा हिचा रथ दोन्ही भावांच्या संरक्षणाखाली राहतो.



सुभद्रेचा रथ दोन रथांच्या मध्ये फिरतो.