आपला लाडका बाप्पा खुलून दिसावा यासाठी पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात फूल खरेदी करण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली आहे. झेंडू, गुलाब, चमेली अश्या विविध प्रकारची फुल आहेत. फुलांची मागणी वाढल्यामुळं दरात देखील मोठी वाढ झाली आहे. बाजारात कोणत्या फुलाला किती दर? झेंडू : 50 ते 80 रुपये किलो शेवंती: 150 ते 200 रुपये किलो गुलाब: 200 रुपायाला 20 फूल अस्टर: 250 ते 300 रुपये किलो बिजली : 200 ते 250 रुपये गुलछडी : 1400 रुपये किलो लिली : 50 रुपये किलो