मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील वाहतूक उद्यापासून नियमित सुरु होणार आहे.



महामार्ग रुंदीकरणासाठी घाटातील वाहतूक महिनाभर सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बंद होती.



या काळात रुंदीकरणाचं अवघं 65 टक्के काम पूर्ण झालं आहे.



दररोज सहा तास घाट बंदची मुदत आज संपुष्टात येत आहे.



कंत्राटदार कंपन्यांची मुदतवाढीची मागणी महामार्ग विभागाने नाकारली आहे.



मुंबई-गोवा महामार्ग कोकणच्या नागमोडी वळणाचा. डोंगरदऱ्यातून तयार केलेला हा महामार्ग.



पावसाळ्यात या ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्याने मोठा धोका निर्माण झाला होता.



त्यामुळे परशुराम घाटाचे पावसाळ्यापूर्वी काम जलद गतीने पूर्ण होण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.



पावसाळ्यापूर्वी रुंदीकरण पूर्ण करणं, आवश्यक तिथे संरक्षण भिंत उभारणं यासाठी वाहतूक सहा तास बंद ठेवली होती