बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोननं कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपल्या अदांनी धुमाकूळ घातलाय.

गेल्या काही दिवसांपासून आपल्या क्लासी आणि हटके लूक्समुळे ती चर्चेत आहे.

कान्समधील दीपिकाचे क्लासी लूकमधील फोटो व्हायरल होत आहेत.

दीपिकानं कान्समधील आपले नवे फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये ती ऑरेंज आउटफिट्समध्ये दिसून येत आहे.

दीपिकानं आपला लूक लाइट मेकअप आणि मेसी बननं कंप्लीट केला आहे.

दीपिकानं आणखी एक फोटो शेअर केलाय, जो व्हायरल होतोय.

कान्समधल्या वेगवेगळ्या लूक्सनी ती चाहत्यांना घायाळ करतेय.

दीपिका सध्या कान्स फेस्टिव्हलमध्ये ज्युरी म्हणून सामिल झाली आहे.

यंदा कान्समध्ये भारत 'कंट्री ऑफ ऑनर' म्हणून सन्मानित करण्यात आलंय.

दीपिका व्यतिरिक्त बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी यंदा कान्समध्ये हजेरी लावलीये.