छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कॉमेडियन सुमोना चक्रवर्तीला द कपिल शर्मा शोमुळे विशेष लोकप्रियता मिळाली.
आता सुमोना ही लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.
अभिनेता सम्राट मुखर्जीसोबत सुमोना लग्नगाठ बांधणार आहे, असंही म्हटलं जात आहे.
सम्राट हा काजोल, तनीषा आणि अयान मुखर्जीचा चुलत भाऊ आहे.
एका मुलाखतीमध्ये सुमोनाला लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सुमोनानं उत्तर दिलं, 'दहा वर्षांपासून या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत. पण हे सगळं खोटं आहे.'
सम्राटसोबतच्या नात्याबाबत सुमोना म्हणाली, 'तो माझा मित्र आहे. '
सम्राट मुखर्जीनं 1996 मध्ये रिलीज झालेल्या 'राम और श्याम' चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
23 एप्रिल 2016 रोजी 'द कपिल शर्मा' शोची सुरूवात झाली.
सुमोनानं या शोमध्ये अनेक भूमिका साकारल्या पण तिच्या भूरी या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.