दूध (Milk) पिण्याचे अनेक फायदे आहेत बरेच लोक केवळ दूध पितात, तर काही लोक दुधात बदाम मिसळून पितात. दुधात अनेक पोषक तत्व असतात. दुधात कॅल्शियम, पोटॅशियम, प्रथिने, व्हिटॅमिन डी, फॉस्फरस, सोडियम आढळते. जन्मापासूनच दूध हे आपले पहिले अन्न मानले जाते. दुधामध्ये तुमच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले सर्व पोषक घटक असतात. हळदीचे दूध पिण्याचे अनेक फायदे आहेत दुधात हळद मिसळून पिणे हा अनेक वर्षांपासून औषधी घरगुती उपाय मानला जात आहे. दुधामुळे हाडे आणि दात अतिशय मजबूत राहतात. दुधामध्ये जीवनसत्त्व, खनिज पदार्थ आणि शरीराला मजबूत करणारे अनेक पोषक तत्वे असतात.