यंदा देशात गव्हाची विक्रमी लागवड



मागील वर्षीच्या तुलनेत 10 टक्क्यांनी क्षेत्र वाढलं



गहू लागवडीची आकडेवारी कृषी मंत्रालयाकडून जाहीर



रब्बी हंगामातील प्रमुख नगदी पिकांमध्ये गव्हाचा समावेश होतो.



भारतात गव्हाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असून अनेक देश भारतातूनच गव्हाची आयात करतात.



केंद्र सरकारनं गव्हाचे उत्पादन वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.



यंदा मोठ्या प्रमाणावर गव्हाची लागवड केली जात आहे.



1 ऑक्टोबरपासून आतापर्यंत विविध राज्यांतील शेतकऱ्यांनी एकूण साडेचार लाख हेक्टरमध्ये गव्हाची पेरणी केली आहे



गव्हाच्या पेरणीखालील क्षेत्राने गेल्या वर्षीचा विक्रमही ओलांडला आहे.



यंदा सुमारे 10 टक्क्यांची अधिक गव्हाची पेरणी झाली आहे.