यंदा देशात गव्हाची विक्रमी लागवड झाली आहे. गव्हाच्या उत्पादनात मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. केंद्र सरकारनं गव्हाच्या लागवडीच्या (Wheat Cultivation) संदर्भातील आकडेवारीची माहिती दिली आहे. देशात यावर्षी गव्हाची विक्रमी लागवड झाली आहे. यंदा गव्हाखालील क्षेत्र गेल्या अनेक वर्षांतील सर्वाधिक आहे. गतवर्षी गव्हाच्या लागवडीची स्थिती फारशी चांगली नव्हती. देशात बटाटा आणि गव्हाची पेरणी अजूनही सुरू आहे. चालू हंगामात 1.58 कोटी हेक्टर क्षेत्रावर कडधान्य पिकांची पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी 97.66 लाख हेक्टरवर तेलबिया पिकांची पेरणी झाली होती. यंदा हा आकडा वाढून 1.05 कोटी हेक्टर झाला आहे यावर्षी कडधान्य, तेलबियांच्या लागवडीत मोठी वाढ झाली आहे.