तळकोकणात सुपारीवर गळ रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे



सुपारीवर गळ रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकरी चिंतेत आहेत



सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुपारीवर गळ रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. या जिल्ह्यात 70 टक्क्यांहून अधिक सुपारी पिकाची गळ झाली आहे.



अनेक ठिकाणी निसर्गाच्या लहरीपणामुळं पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होत आहे.



तळकोकणात मोठ्या प्रमाणावर सुपारीचे उत्पादन घेतलं जातं



कोकणात सुपारीवर गळ रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.



गळ लागलेल्या सुपारीला बाजारात योग्य तो भाव देखील मिळत नाही



सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांवतवाडी आणि दोडामार्ग या तालुक्यात सर्वाधिक सुपारीचे सर्वाधिक उत्पादन घेतलं जाते.



निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका सुपारी उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.



कोकणातील सुपारी उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.