बाटलीबंद पाणी सुरक्षित असतं, असा अनेकांचा समज आहे. यामागचं मुख्य कारण म्हणजे बाटलीबंद पाणी आपण विकत घेतो.

त्यामुळे हे नळाच्या पाण्यापेक्षा स्वच्छ आणि आरोग्यदायी असतं, असं अनेकांना वाटतं. यामुळे अलिकडच्या काळात बाटलीबंद पाण्याच्या मागणीत वाढ झाली आहे.

वाढत्या मागणीमुळे बाटलीबंद पाण्यांमध्येही भेसळ होत असल्याचं समोर आलं आहे.

नफा कमवण्यासाठी काही जण नळाचं पाणी बॉटलमध्ये भरून ते तसंच प्रक्रिया न करता त्याची विक्री करतात आणि या भेसळीतून पैसे कमावतात.

आपण स्वयंपाक करण्यासाठी, भांडी धुण्यासाठी आणि आंघोळ या कामासाठी जे पाणी वापरतो, त्यापेक्षा बाटलीबंद अर्धा लिटर पाण्याची किंमत जास्त आहे. यामागचं गणित कसं आहे जाणून घ्या.

प्लास्टिकच्या बाटलीची किंमत साधारणपणे 80 पैसे, एक लिटर पाण्याची किंमत 1.2 रुपये, विविध प्रक्रिया करण्यासाठी एका बाटलीवर सुमारे 3.40 रुपये खर्च येतो.

याशिवाय अतिरिक्त खर्च म्हणून 1 रुपये खर्च केले जातात.

अशा प्रकारे बाटलीबंद पाण्याच्या एका बाटलीची एकूण किंमत 6.40 पैसे आहे.

साधारणपणे 7 रुपये मूळ किंमत असलेल्या पाण्यासाठी आपण 20 रुपये किंवा त्याहूनही अधिक खर्च करतो.