अलिकडच्या काळात देशातही विवाहबाह्य संबंधांमध्ये वाढ झाल्याचं आढळून आलं आहे.
विवाहबाह्य संबंधांसंदर्भात अलिकडेच एक अहवाल समोर आला आहे.
भारतात अर्ध्याहून अधिक लोक त्यांचा जोडीदाराची फसवणूक करतात, अशी धक्कादायक माहिती अहवालातसमोर आली आहे.
देशातील निम्म्याहून अधिक विवाहित जोडप्यांना आयुष्यात एकदा तरी 'पती, पत्नी आणि वो' या लढाईला सामोरं जावं लागतं.
भारतातील पहिलं विवाहबाह्य ग्लीडन डेटिंग अॅपच्या सर्वेक्षणानुसार, जवळजवळ 55 टक्के विवाहित भारतीय त्यांच्या जोडीदाराशी किमान एकदा तरी अफेअर केलं आहे.
आश्चर्यकारक बाब म्हणजे यामध्ये महिलांनी पुरुषांना मागे टाकलं आहे. विवाहबाह्य संबंधांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांचं प्रमाण जास्त आहे.
अहवालानुसार, 56 टक्के महिलांनी त्यांच्या जोडीदाराची फसवणूक केली.
अहवालानुसार, 48 टक्के भारतीयांचा असा विश्वास आहे की, एकाच वेळी दोन लोकांवर प्रेम करणं शक्य आहे, तर 46 टक्के लोकांना वाटते की, प्रेमात असताना कोणीही फसवू शकतं.
कदाचित याच कारणामुळे भारतीय त्यांच्या जोडीदाराच्या अफेअरची माहिती मिळाल्यावर त्यांना माफ करण्यासही तयार आहेत. या अहवालानुसार, 7 टक्के लोक विचार न करता आपल्या जोडीदाराला माफ करतात.
त्याचप्रमाणे 69 टक्के लोक ज्यांनी फसवणूक केली आहे, त्यांना त्यांच्या जोडीदाराकडून माफीची अपेक्षा आहे.
भारतातील 49 टक्के विवाहित लोकांनी त्यांच्या जोडीदाराव्यतिरिक्त इतर कोणाशी प्रेमसंबंध असल्याचं कबूल केलं आहे.
तर, 10 पैकी 5 जणांनी आधीच कॅज्युअल सेक्स किंवा वन-नाइट स्टँड केल्याचं समोर आलं आहे.
भारतीय महिला एक्ट्रामॅरिटल अफेअरच्या बाबतीत सर्वात पुढे आहेत.
26 टक्के पुरुषांच्या तुलनेत 41 टक्के महिलांनी त्यांच्या जोडीदाराशिवाय इतर कोणाशीही नियमितपणे लैंगिक संबंध ठेवल्याचं मान्य केलं.