जगभरात दारुचे अनेक शौकीन आहेत. पण, एक देश असाही आहे, जेथे दारु प्यायल्यावर तुम्हाला फाशीची शिक्षा होऊ शकते.



भारतासह काही देशांमध्ये दारुचे सेवन करण्यासाठी काही नियम लागू करण्यात आलेले आहेत. पण काही देशांमध्ये दारु बंदी लागू आहे.



एका देशात तर दारू प्यायल्यास तुम्हाला फाशीची शिक्षा होईल.



भारताच्या शेजारील एक देशामध्ये हा नियम लागू आहे. या देशात दारु पिण्यावर आणि दारू विक्री पूर्णपणे बेकायदेशीर आहे.



भारताशेजारील देश इराणमध्ये दारुसंदर्भात फार कडक नियम आहेत. इराणमध्ये कुणीही दारुचं सेवन करताना किंवा आणताना पकडलं गेल्यास त्याला दंड भरावा लागेल.



इतकंच नाही तर दारु संबंधित गुन्हासाठी संबंधित व्यक्तीला तुरुंगवास आणि फाशीची शिक्षाही होऊ शकते. दारु विक्री करण्याऱ्यावरही येथे कठोर कारवाई करण्यात येते.



इराणमध्ये दारु विक्री करताना आढळल्यास 80 चाबकाच्या फटक्यांची शिक्षा देण्यात येते.



इराणमध्ये दारु पिण्यास कायदेशीर मान्यता नाही. येथे कोणत्याही वयाची व्यक्ती दारु पिताना आढळल्यासा त्याचावर कारवाई करण्यात येते.



त्यामुळे हा नियम मोडणाऱ्या प्रत्येकाला शिक्षा भोगावी लागते मग ती, व्यक्ती अल्पवयीन असो किंवा प्रौढ.



याशिवाय, जर एखादी व्यक्ती वारंवार दारु संबंधित गुन्ह्यांमध्ये दोष आढळल्यास त्या व्यक्तीला फाशीची शिक्षाही होऊ शकते.



इराण हे मुस्लिम बहुसंख्य देश आहे. मुस्लिम धर्मात अल्कोहोलयुक्त पेये तयार करणे आणि सेवन करणे या दोन्ही गोष्टींना सक्त मनाई आहे. त्यामुळे येथे दारुबंदी आहे.