मुघलांकडून कोहिनूर हिरा लूटणारा नादिर शाह कोण? इराणी साम्राज्याचे पूर्वी प्रांत खुरासान येथे नादिर शाहचा जन्म झाला. इतिहासकार मायकल एक्सॉर्डीने त्यांच्या 'इराण : एम्पायर ऑफ द माइंड' पुस्तकात याला उल्लेख केला आहे. नादिर शाहने 1739 मध्ये भारतावर आक्रमण केलं. कर्नालमध्ये मुगल बादशाह मोहम्मद शाहच्या सैन्याला हरवलं. यावेळी त्याने मुघलांकडून कोहिनूर हिला लुटला. नादिर शाहने दिल्लीतून मोठ्या प्रमाणात सोने, चांदी आणि मौल्यनान वस्तू लुटल्या. सिंधु नदीच्या पश्चिमेकडील मुघल क्षेत्रातील कर वसूली केली. नादिर शाहने मुघलांकडून सुमारे 700 मिलियन म्हणजेच 70 कोटी रुपयांची संपत्ती लुटली. नादिर शाहने इराणी वर्चस्व प्रस्थापित केलं. त्याने पर्शियाचा शाह बनत रशियन साम्राज्याला इराणच्या प्रदेशातून बाहेर काढलं.