वाचन केल्याने आपल्या ज्ञानामध्ये भर पडते. असे आपण लहान पण पासून ऐकलं असेलच वाचन केल्याने आपले मानसिक आरोग्य देखील सुधारते जेव्हा आपण पुस्तक वाचतो तेव्हा वाचताना काही लोक रडायला आणि काही लोक हसायला लागतात. वैद्यकीय तज्ज्ञ म्हणतात की, एखादी कथा वाचत असताना आपण तिथल्या जीवनाची, वातावरणाची कल्पना करू लागतो. खरं तर वाचनाची भावना आपल्याला तणावापासून मुक्त करते. वाचनाच्या सवयीमुळे आपले मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. वाचन करत असताना आपले मन आणि मेंदू त्या पुस्तकात हरवून जाते. वाचन केल्याने झोप देखील चांगली लागते त्यामुळे आरोग्य चांगले राहते वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.