यपीएलचा 16वा हंगाम अर्थात आयपीएल 2023 काही महिन्यांवर आली आहे.



आताच स्पर्धेची धामधूम सुरु झाली आहे.



आगामी हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव झाला असून आता लिलावानंतर आरसीबीने नवं गाणं सर्वांसमोर आणलं आहे.



'नया शेर आया' हे नवीन टीमचं एक धांसू गाणं लॉन्च केलं आहे.



या गाण्यात भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीची एका खास अंदाजात दिसत आहे.



तो गाण्यात डान्सही करत आहे.



प्रसिद्ध रॅपर डिवाईन या गाण्याचा सिंगर आहे.



आरसीबीचे हे गाणे सोशल मीडियावरही वेगाने व्हायरल होत आहे.



विराट एका जर्सीत दिसत असून ही आरसीबीची आगामी सिजनसाठी जर्सी असू शकते.



या गाण्यात विराटचा अंदाज अगदी धांसू आहे.