भारतीय चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
भीषण कार अपघातात जखमी झालेला भारताचा ऋषभ पंतच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे.
पंतच्या प्रकृतीचा आढावा घेतल्यानंतर दिल्ली अँड डिस्ट्रीक्ट क्रिकेट असोसिएशन अर्थात DDCA च्या टीमने ही माहिती दिली
पंत च्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं त्यांनी सांगितले आहे.
तसंच आणखी उत्तम उपचारांची आवश्यकता असल्यास, त्याला दुसऱ्या रुग्णालयात शिफ्टही केले जाऊ शकते असंही त्यांनी सांगितलं.
ऋषभ पंतची प्रकृती जाणून घेण्यासाठी DDCA टीम शनिवारी डेहराडून मॅक्स हॉस्पिटलमध्ये पोहोचली.
पंतच्या प्रकृतीचा आढावा घेतल्यानंतर डीडीसीए टीमने आपल्या निवेदनात डॉक्टरांच्या उपचाराने आम्ही समाधानी असून बीसीसीआय पंतच्या शिफ्टिंगबाबत निर्णय घेणार असं म्हटलं.
बीसीसीआयचे डॉक्टरही सतत संपर्कात असल्याचं समोर आलं आहे.
रिपोर्ट्सनुसार, ऋषभ पंतच्या गुडघा आणि घोट्याचे एमआरआय स्कॅन अद्याप झालेले नाही.
त्यांचा मेंदू आणि मणक्याचा एमआरआय नॉर्मल आहे.
पंत लवकर बरा होऊन मैदानावर परतावा अशी आशा क्रिकेटप्रेमी व्यक्त करत आहेत.