विराटच्या नावावर आतापर्यंत अनेक विश्वविक्रम आहेत.



या यादीत आणखी एक विशेष विक्रम आहे जो मागील 12 वर्षांपासून मोडलेला नाही.



या वर्षाच्या अखेरपर्यंत देखील हा विक्रम अबाधित राहिला आहे.



कोहली गेली सलग 12 वर्षे भारतीय फलंदाजांच्या यादीत वर्षअखेरीच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे.



यंदा अर्थात 2022 मध्येही हा विक्रम कायम ठेवण्यात त्याला यश आलं आहे.



कोहलीने ऑगस्ट 2008 मध्ये श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेमध्ये पदार्पणाचा सामना खेळला होता.



यानंतर त्याने आतापर्यंत 265 वनडे खेळताना 12 हजार 471 धावा केल्या आहेत.



2011 पासून वर्षाच्या अखेरीस एकदिवसीय क्रमवारीत कोहली अव्वल भारतीय फलंदाज आहे.



सलग 12 वर्षे अशी कामगिरी करणारा तो भारतीय फलंदाजांच्या यादीत एकमेव खेळाडू आहे.



कोहली आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत ओव्हरऑल 8 व्या स्थानावर आहे.



या यादीत रोहित शर्मा त्याच्या खालोखाल 9 व्या स्थानावर आहे.