भारताला पहिला विश्वचषक जिंकवून देणारे कर्णधार कपिल देव यांचा आज वाढदिवस 1983 साली भारताला पहिला विश्वचषक कपिल देव यांच्या नेतृत्त्वाखाली जिंकता आला संपूर्ण स्पर्धेत एक उत्तम कर्णधार आणि क्रिकेटर अशी भूमिका कपिल यांनी निभावली आज त्यांचा 64 वा वाढदिवस आहे. सर्व खेळांमध्ये तितकाच रस असणारे कपिल एक दिग्गज क्रिकेटर म्हणून ओळखले जातात. भारताचे सर्वकालिन महान अष्टपैलू कपिल देव हेच आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक अप्रतिम खेळी केल्या आहेत. गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीने त्यांनी कमाल केली आहे. अनेक क्रिकेटर्सचे ते आदर्श आहेत 83 सिनेमात रणवीर सिंहने कपिल यांची भूमिका साकारली होती