पपई आपल्या तब्येतीसाठी चांगला मानला जातो. तुम्ही कच्ची किंवा पिकलेली अशा दोन्ही प्रकारचे पपई खाऊ शकता. कच्च्या पपईमध्ये व्हिटॅमिन ए, सी, ई, बी आणि मॅग्नेशियम, पोटॅशियम सारखी खनिजे आढळतात. कच्ची पपई खाल्ल्याने महिलांना मासिक पाळी येण्याच्या त्रासात आराम मिळतो. कच्ची पपई खाल्ल्याने शरीराला भरपूर फायबर मिळतं. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि पचनक्रिया सुधारते. कच्ची पपई खाल्ल्याने किंवा त्याचा रस प्यायल्याने शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण योग्य राहते. कच्ची पपई खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि सर्दी आणि फ्लूची समस्या दूर होते. मुलांना खायला घालणाऱ्या आईने कच्ची पपई जरूर खावी. कच्च्या पपईमुळे दूध वाढण्यास मदत होते. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.