प्रसिद्ध अभिनेत्री मंदाना करीमी तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असते.



मंदानाच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आहे.



मंदाननं एकता कपूर आणि कंगना रनौत यांच्या लॉकअप (Lock Upp) शोमध्ये सहभाग घेतला होता.



सध्या मंदाना तिच्या डान्सच्या व्हिडीओमुळे चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये मंदाना ही बुरखा परिधान करुन डान्स करताना दिसत आहे.



मंदानाला अनेकांनी ट्रोल केलं. या ट्रोलर्सला मंदानानं सडेतोड उत्तर दिलं आहे.



मंदानानं इंस्टाग्राम एक स्टोरी शेअर केली. या स्टोरीमध्ये तिनं लिहिलं, 'बुरखा रिलवर आलेले सर्व कमेंट्स मी वाचले. हे लोक पागल आहेत. हे जग पागल आहे. माझं काम झालं.'



पोस्टमध्ये तिनं एका यूनिकॉर्न इमोजीचा देखील वापर केला आहे. मंदानानं शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिचा ब्लॅक शॉर्ट ड्रेस लूकमधील फोटो दिसत आहे.



मंदानानं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती एका मॉलमध्ये डान्स करताना दिसत आहे.



मंदाना करीमीने जानेवारी 2017 मध्ये बिझनेसमन गौरव गुप्तासोबत लग्न केले होते.



लग्नापूर्वी दोघे दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. पण, लग्न झाल्यानंतर काही महिन्यांनी दोघे वेगळे झाले.