कच्च्या दूधात भरपूर फॅट असल्यामुळे हे दूध मॉइश्चरायझर म्हणून वापरावे.
कच्च्या दुधामुळे त्वचेची टॅनिंग कमी होते आणि त्वचा चमकदार बनते.
कच्च दूध चेहऱ्यावर लावल्यास त्वचेवरील जळजळ,लालसरपणा कमी होण्यास मदत होते.
कच्च्या दूधाच्या नियमित वापरामुळे त्वचेची पोत चांगली होते आणि त्वचा नितळ बनते.
गुलाब पाणी आणि कच्च दूध एकत्र करून लावल्यास त्वचा संसर्ग मुक्त राहते.
कच्चे दूध चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी होतो.
तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स असतील तर दूध आणि मधाचे एकत्रित मिश्रण चेहऱ्यावर लावा.
चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी कच्चे दूध उपयुक्त ठरते.
रोज चेहरा स्वच्छ करताना कच्च्या दुधाचा वापर केला तर चेहऱ्यावरील डेड स्कीन निघून जाण्यास मदत होते.
कच्च्या दुधात प्रथिनांचे प्रमाण खूप जास्त असते, ही प्रथिने त्वचा घट्ट करण्यास मदत करतात.
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.