रवींद्र जाडेजाला जगातील स्टार अष्टपैलू खेळाडू म्हणून पाहिलं जातं. यंदा आयपीएलमध्येही तो चेन्नई संघाचा कर्णधार आहे. भारतीय संघातील तो सर्वात टॉपचा अष्टपैलू खेळाडू आहे. त्यामुळे त्याची ब्रँड व्हॅल्यू तितकीच अधिक आहे. जाडेजाच्या या सर्व संपत्तीचा मुख्य स्रोत क्रिकेट आहे. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट तसंच आय़पीएलमधून सर्वाधिक पैसे कमवतो. त्याची संपत्ती जवळपास 100 कोटींच्या घरात आहे. आयपीएलमध्ये यंदा देखील त्याला तब्बल 16 कोटी रुपये देत चेन्नई संघाने महालिलावापूर्वीच रिटेन केलं होतं. गुजरातच्या जामनगरमध्ये रवींद्र जाडेजाचं एक अत्यंत आलिशान असं डिझायनर घर आहे या बंगल्याशिवाय त्याच एक फार्म हाऊस देखील आहे. त्याला घोडेस्वारीचाही शौक आहे. रिपोर्ट्सनुसार त्याच्याकडे अनेक गाड्या असून यात ब्लॅक ह्युंडाई एक्सेंट, सफेद ऑडी क्यू7, बीएमडब्ल्यू एक्स1 आणि हायाबुसा बाईक अशी वाहनं आहेत.