अभिनेता आणि खासदार रवी किशन (Ravi Kishan) हे भोजपुरी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आहेत. त्यांनी हिंदी आणि तेलुगू चित्रपटांमध्ये देखील काम केलं.
नुकत्याच एका मुलाखतीध्ये रवी किशन यांनी त्यांच्या स्ट्रगल स्टोरीबाबत सांगितलं. तसेच रवी किशन यांनी कास्टिंग काऊचचा देखील सामना केला आहे.
'तुमच्यासोबत कास्टिंग काऊच झालं आहे का?' असा प्रश्न रवी किशन यांना एका मुलाखतीमध्ये प्रश्न विचारण्यात आाला.
रवी किशन यांनी कास्टिंग काउचबद्दल सांगितलं, 'हो, कास्टिंग काउचचा सामना मी केला. पण सुदैवानं मी तिथून पळून आलो.
'इमानदारीच्या मार्गानेच ध्येय गाठले जाते, हे माझ्या वडिलांनी मला शिकवले होते. मला शॉर्टकटचा वापर करायचा नव्हता. मी आयुष्यात कधीच शॉर्टकटचा वापर करु इच्छित नाही. ' असंही रवी यांनी सांगितलं.
पुढे ते म्हणाले, 'मी त्या व्यक्तीचे नाव सांगू शकत नाही. कारण ती व्यक्ती खूप प्रसिद्ध झाली आहे. मी तेव्हा वाचलो. मी त्यांना म्हणालो की, मला चित्रपट नको आहे. ते म्हणाले रात्री कॉफी प्यायला ये आणि मी म्हणालो की, लोक दिवसा कॉफी पितात. मग मी तिथून बाहेर आलो, अडकलो नाही.''
रवी किशन यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'तेरे नाम' या हिंदी चित्रपटातील भूमिकेमुळे रवी किशन यांना लोकप्रियता मिळाली.
आग का तुफान, फिर हेरा फेरी, गंगा, लक, लूट, किक-2 यांसारख्या चित्रपटांमध्ये रवी किशन यांनी काम केलं आहे.