'नॅशनल क्रश' म्हणजेच अभिनेत्री रश्मिका मंदाना तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. नुकतेच रश्मिकाने इंस्टाग्रामवर बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजातील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये रश्मिका ब्लॅक आणि सिल्हर स्ट्रॅप लेस ड्रेसमध्ये दिसत आहे. या ड्रेससोबत रश्मिकाने स्मोकी आय मेकअप आणि न्यूड लिपस्टिक असा लूक केला आहे. रश्मिकाचा किलर लूक या फोटोंमध्ये दिसत आहे. तिच्या सौंदर्यावर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. रश्मिकाच्या या अंदाजाने चाहते घायाळ झाले आहेत. रश्मिकाला 'पुष्पा' या तेगुलू चित्रपटामुळे अधिक प्रसिद्धी मिळाली. रश्मिका सध्या 26 वर्षांची असून तिचा जन्म 5 एप्रिल 1996 रोजी कर्नाटकमध्ये झाला. रश्मिका मंदानाने सायकॉलॉजीमध्ये पदवी शिक्षण पूर्ण केलं आहे. 2016 साली रश्मिकाने 'किरिक पार्टी' या कन्नड चित्रपटातून केला. 2018 साली आलेला 'गीता गोविंदम' हा रश्मिकाचा चित्रपट विशेष गाजला. रश्मिका मंदानाने कन्नड, तेलुगु, तामिळ आणि हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.