अजय देवगणचा भोला हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
सध्या अजय हा भोला या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे.
नुकतीच अजयनं भोला चित्रपटाच्या प्रमोशनसाठी द कपिल शर्मा शोमध्ये (The Kapil Sharma Show) हजेरी लावली.
अजयनं द कपिल शर्मा शोमध्ये ऑस्करबाबत एक वक्तव्य केलं. त्याच्या या वक्तव्यानं अनेकांचे लक्ष वेधले.
आरआरआर चित्रपटानं ऑस्कर जिंकल्याबद्दल कपिल शर्माने अजयचे अभिनंदन केले. त्यानंतर कपिल शर्माने अजयला विचारले, 'आरआरआर या चित्रपटाच्या नाटू नाटू गाण्याला ऑस्कर मिळाला, तुमचे खूप खूप अभिनंद.'
'ज्या चित्रपटात काम केलं, त्या चित्रपटाला ऑस्कर मिळेल, असा विचार तुम्ही कधी केला होता का?' असा प्रश्न अजयला कपिलनं विचारला.
कपिलच्या या प्रश्नाला उत्तर देत अजय म्हणाला, 'आरआरआरला माझ्यामुळेच ऑस्कर मिळाला आहे. मी त्या गाण्यात नाचलो असतो तर? याचा विचार करा' अजयचं हे वाक्य ऐकून प्रेक्षक खळखळून हसतात.
अजय हा त्याच्या भोला या आगामी चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात अजयसोबतच तब्बू देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे.
'भोला' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरादेखील अजय देवगणने सांभाळली आहे.
अजयच्या भोला या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.