मराठी चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते.



प्राजक्ताचा चाहता वर्ग मोठा आहे. प्राजक्तानं नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले.



प्राजक्तानं या फोटोला कॅप्शन दिलं, 'देखा जो तुमको ये दिल को क्या हुआ है । मेरी धडकनों पे ये, छाया क्या नशा है। मोहब्बत……'



फोटोमध्ये प्राजक्ता ही मरुन अँड ब्लॅक कलरची साडी, इअरिंग्स आणि ब्रेसलेट अशा लूकमध्ये दिसत आहे.



प्राजक्ताच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.



'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामधून देखील प्राजक्ता प्रेक्षकांच्या भेटीस येते. तसेच लकडाऊन हा प्राजक्ताचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.



जुळून येती रेशिमगाठी या मालिकेमुळे प्राजक्ताला विशेष लोकप्रियता मिळाली.



प्राजक्ता सोशल मीडियावर सक्रिय असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते.



प्राजक्ताला इन्स्टाग्रामवर 1.9 मिलियन फॉलोवर्स आहेत.



प्राजक्ताच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.