प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रवी टंडन यांचे आज पहाटे 3.30 वाजता त्यांच्या मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. मृत्यूसमयी ते 86 वर्षांचे होते. अभिनेत्री रवीना टंडन हिने पोस्ट लिहित ही दुःखद बातमी चाहत्यांना दिली. 86 वर्षीय रवी टंडन यांना चालता येत होते, मागील काही काळापासून त्यांना फुफ्फुसाचा त्रास होता फुफ्फुसातील फायब्रोसिस नावाच्या आजाराने ते त्रस्त होते यामुळे त्यांना श्वास घेण्यास खूप त्रास होत होता मुंबईतील जुहू येथील त्यांच्या घरी अखेरचा श्वास घेतला