अभिनेत्री कतरिना कैफ ही नुकतीच विमानतळावर स्पॉट झाली. पिवळ्या रंगाचा ड्रेस आणि डोळ्यावर गॉगल अशा लूकमध्ये कतरिना स्पॉट झाली. कतरिनाच्या या सिंपल लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 'मेरी क्रिसमस' या आगामी चित्रपटामधून कतरिना प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. कतरिना ही तिच्या स्टाईलनं आणि अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते. कतरिनाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. कतरिनाचा 'टायगर 3' हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सरकार,नमस्ते लंडन,वेलकम, पार्टनर या चित्रपटांमध्ये कतरिनानं काम केलं. कतरिनानं 2021 मध्ये विकी कौशलसोबत लग्न केलं. कतरिनानं अनेक हिट चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे.