काही चित्रपटांनी पहिल्या वीकेंडला 100 कोटींपेक्षा जास्त कमाई केले. जाणून घेऊयात या चित्रपटांबद्दल... शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटानं पाच दिवसात 271 कोटींची कमाई केली. तसेच शाहरुखच्या जवान या चित्रपटानं फर्स्ट वीकेंडला 252 कोटींची कमाई केलेली आहे. केजीएफ: चॅप्टर-2 या चित्रपटानं रिलीजनंतर पहिल्या चार दिवसांमध्ये 193 कोटींची कमाई केली आहे. सलमान खानच्या सुलतान या चित्रपटानं पहिल्या वीकेंडला 180.36 कोटींची कमाई केली. सनी देओलच्या गदर-2 या चित्रपटानं पहिल्या वीकेंडला 134.88 कोटींची कमाई केली. तसेच बाहुबली-2 या चित्रपटानं फर्स्ट वीकेंडला 128 कोटींची कमाई केली. संजू या चित्रपटानं पहिल्या वीकेंडला 120.06 कोटींची कमाई केली आहे. सलमानच्या टायगर जिंदा है या चित्रपटानं पहिल्या वीकेंडला 114.93 कोटींची कमाई केली. रणबीर कपूरच्या ब्रह्मास्त्र-2 या चित्रपटानं पहिल्या वीकेंडला 111.2 कोटींची कमाई केली आहे. आमिर खानच्या दंगल या चित्रपटानं फर्स्ट वीकेंडला 104.46 कोटींची कमाई केली आहे.