प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
केंद्र सरकारकडून रतन टाटा यांची नियुक्ती पीएम केअर फंडाच्या विश्वस्तपदावर करण्यात आली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने याबाबत निवेदन जारी करून या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.
पीएम केअर फंडाच्या विश्वस्तपदी रतन टाटा यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश के.टी.थॉमस, लोकसभेचे माजी उपसभापती करिया मुंडा यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.