काँग्रेस पक्षाध्यक्षपदाच्या निवडीवरून पक्षात अंतर्गत हालचाली वाढल्या आहेत



गुजरात, महाराष्ट्र, राजस्थानसह आणि दिल्लीसह अनेक राज्यांतील काँग्रेस समित्यांनी राहुल गांधी यांची काँग्रेस अध्यक्षपदी निवड करण्याचा ठराव मंजूर केला आहे



असे असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर हेही पक्षाध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरणार आहेत



त्यासाठी त्यांना काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींकडूनही परवानगी मिळाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.



शशी थरूर यांनी सोमवारी दिल्लीत सोनिया गांधी यांची भेट घेतली.



सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शशी थरूर यांना पक्षाध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्यास सोनिया गांधींकडून मंजुरी मिळाली आहे



सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या आहेत की, जर त्यांची (शशी थरूर) इच्छा असेल तर ते पक्षाध्यक्षपदासाठी निवडणूक लढवू शकतात



कोणीही निवडणूक लढवू शकतो. असं असलं तरी ते सोन्या गांधी यांना कोणत्या संदर्भात भेटले, हे शशी थरूर यांनी स्पष्ट केले नाही



अलीकडेच थरूर यांनी सभापतीपदासाठी निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते. त्याच दरम्यान त्यांची सोनिया गांधी यांच्याशी भेट झाली आहे.



दरम्यान, काँग्रेसचा पुढील अध्यक्ष कोण होणार याबाबत अद्यापही सस्पेंस कायम आहे