देशातील कोरोनाचा आलेख पुन्हा एकदा घसरला आहे.



देशात पाच हजार नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.



केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 5 हजार 747 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.



त्याआधी बुधवारी 6298 नवीन रुग्ण कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 23 रुग्णांचा मृत्यू झाला होता.



ही आकडेवारी पाहता कोरोनाबाधितांची संख्या घटली असून कोरोनाबळींच्या मृत्यूमध्ये वाढ झाल्याचं दिसून येतं.



देशातील कोरोना रुग्णांमध्ये 551 रुग्णांची घट झाली आहे.



भारतात बुधवारी दिवसभरात 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.



देशात कोरोना महामारी पसरण्यास सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत एकूण 5 लाख 28 हजार 302 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.



देशात गेल्या 24 तासांत 5 हजार 748 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत.



केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सध्या देशात 46 हजार 848 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.