केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाची नवीन आकडेवारी जारी केली आहे. यामध्ये दिलासादायक बाब समोर आली आहे.


देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. देशात सलग तिसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांची संख्या घसरली आहे.


देशात गेल्या 24 तासांत म्हणजेच रविवारी दिवसभरात 4 हजार 858 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत.


त्याआधी 18 सप्टेंबरला देशात 5 हजार 664 नवीन रुग्णांची नोंद झाली होती. आज ही संख्या चार हजारांपर्यंत खाली घसरली आहे.


देशातील कोरोनाचा आले दिवसेंदिवस घटताना पाहायला मिळत आहेत.


मात्र देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या मात्र वाढताना दिसत आहे.


देशात सध्या 48 हजारहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. आधीच्या दिवशी रविवारी ही संख्या 47 हजारांवर होती. तर त्याआधी शनिवारी उपचाराधीन रुग्णांची संख्या 46 हजारांवर होती.


सध्या देशात 48 हजार 27 सक्रिय रुग्ण आहेत.


देशात एकूण 5 लाख 28 हजार 355 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.