देशातील कोरोना संसर्गाचा आलेख सलग दुसऱ्या दिवशी घसरला आहे.


देशात गेल्या 24 तासांत म्हणजेच शनिवारी 5 हजार 664 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 35 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही नवी आकडेवारी जारी केली आहे. त्याआधी देशात शुक्रवारी 5 हजार 747 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 29 रुग्णांचा मृत्यू झाला होता. म्हणजेच तुलनेनं 83 रुग्णांची संख्या घटली आहे.


देशात शनिवारी दिवसभरात म्हणजेच गेल्या 24 तासांत 35 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


एकीकडे देशातील नवीन रुग्णांची संख्या कमी झालेली पाहायला मिळते. मात्र दुसरीकडे देशातील सक्रिय रुग्णांची संख्या वाढलेली दिसत आहे.


देशात सध्या 47 हजारहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. काल ही संख्या 47 हजारांवर होती. सध्या देशात 47 हजार 922 सक्रिय रुग्ण आहेत.


देशात नव्या 35 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.


दिलासादायक बाब अशी आहे की, देशात चार हजारहून अधिक रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत.


गेल्या 24 तासांत 4 हजार 555 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.


गेल्या सात दिवसात देशात 38 हजार 829 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत.


कोरोना महामारी सुरु झाल्यापासून आजपर्यंत देशात एकूण 4 कोटी 45 लाख 34 हजार 188 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे.