ब्रेकफास्ट पासून डिनर पर्यंत प्रत्येक मेनू मध्ये स्वतःची जागा बनवणारा पदार्थ म्हणजे अंड!

ब्रेकफास्टमध्ये दररोज अंडे खाल्याने आरोग्याच्या अनेक तक्रारी कमी होण्यास मदत होते.

अंड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लोह, कॅल्शिअम आणि प्रथिने असतात

चला तर आज जाणून घेऊया अंड्याचे असे काही पदार्थ जे जिभेसह नजरेचीही भूक भागवतात..

Open toast Egg sandwich : जर तुम्ही अंड खाण्याचे शौकीन असाल तर हा पदार्थ तुम्ही नक्कीच ट्राय करायला हवा.. टोस्ट केलेला ब्रेड आणि त्यावर ठेवलेलं अंड, मशरुम आणि वेगवेगळे मसाले याची चव आणखीचं वाढवतात..

Classic scrambled eggs with toast : अंड्याची सर्वात सोपी आणि स्वादिष्ट डिश, थोडी फार आपल्या भुर्जी सारखीच तरीही चवीला वेगळी..

Shakshuka : हा अंड्याचा एक भन्नाट पदार्थ सर्वांनी चाखून बघायलाचं हवा, वेगवेगळ्या भाज्यांचं कॉम्बिनेशन आणि त्यावर पसरवलेली अंडी.चवीला अगदी उत्तम लागतात..

Sunny side up : हा पदार्थ तुम्ही खाल्ला नसेल तर तुम्ही अंड खाल्लचं नाही! फक्त एका बाजूने शिजलेलं अंड आणि त्यावर घातलेली लाल मिर्ची चवीला अनेक खवय्यांच्या पसंतीचं आहे..

Baked eggs : आपण अंड जसं तळून खातो त्याऐवजी जर ते ओव्हनमध्ये बेक केलं तरी ते तेवढंच चविष्ट आणि healthy बनतं..

Soft scrambled eggs with sautéed mushrooms : अंड आणि मशरूमचं कॉम्बिनेशन म्हणजे परिपूर्ण नाश्ता; एकदा ट्राय करायलाच हवा!