सुयश टिळक आणि आयुषी भावे यांचा नुकताच लग्न सोहळा पार पडला

आयुषी आणि सुयशच्या चाहत्यांनी आणि मित्र-मैत्रिणींनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय..

महाराष्ट्राची कुलदैवत कोल्हापूरची देवी श्री आंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतरचे फोटो त्यानं त्याच्या चाहत्यांपर्यंत पोहचवलेत.

त्या आधी दोघांनी ज्योतीबाचं दर्शन घेतलं, या फोटो दोघेही गुलालात माखलेले दिसून येतायत..

काही दिवसांपूर्वीचं म्हणजे 21 ऑक्टोबर रोजी या दोघांचा लग्न सोहळा पार पडला होता..

लग्नसोहळ्यानंतर आयुषी आणि सुयश देवदर्शनासाठी सध्या बाहेर पडलेत

यातलेच काही खास फोटो सुयशने सोशल मीडियावर शेअर केलेत.

सुयश टिळक आणि आयुषी भावे यांचा नुकताच लग्न सोहळा पार पडला.

सुयशनं सोशल मीडियावर फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

या दोघांनी शेअर केलेले दर्शनाचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.. या नव दाम्पत्याच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा!