नॅशनल क्रश अशी ओळख असणाऱ्या रश्मिका मंदनानं नुकतेच क्लासी लूकमधील फोटो शेअर केले आहेत. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदनाचा चाहता वर्ग मोठा आहे रश्मिकानं नुकतेच तिच्या क्लासी लूकमधील फोटो शेअर केले आहेत. A bit of fresh breeze for your feed today… असं कॅप्शन रश्मिकानं फोटोला दिलं आहे. रश्मिकाच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. व्हाईट कलरचा वन पीस, ब्लॅक हिल्स अन् गोल्डन इअरिंग्स अशा लूकमधील फोटो रश्मिकानं शेअर केले आहेत. रश्मिकाचा लवकरच गुडबाय हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. गुडबाय चित्रपटात रश्मिकासोबतच अमिताभ बच्चन हे देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. रश्मिकाला पुष्पा या चित्रपटामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. रश्मिकानं पुष्पा चित्रपटामध्ये श्रीवल्ली ही भूमिका साकारली. वेगवेगळ्या लूकमधील फोटो रश्मिका सोशल मीडियावर शेअर करते.